Hitendra Thakur Palghar Lok Sabha : बापाचं राज्य आहे का? हिंतेंद्र ठाकूर यांनी कुणाला दिला दम?
पालघर : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, त्यांना डहाणूपर्यंत येऊ देणार नाही असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी नाव न घेता बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकुर (Hitendra Thakur) यांना दिला. तर हितेंद्र ठाकुर यांनीही पलटवार केला. तुम्ही मोदींच्या नावे मतं मागता, मग इथला खासदार फक्त बोट वर करण्यासाठी हवाय का असा सवाल त्यांनी विचारला.
डहाणूमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांना इशारा दिला. वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला.



















