Hingoli Water Issue : हिंगोलीत पाणीटंचाईचं संकट, पशुधन बाजारात विक्रीसाठी दाखल
Hingoli Water Issue : हिंगोलीत पाणीटंचाईचं संकट, पशुधन बाजारात विक्रीसाठी दाखल
हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आता पाणीटंचाई निर्माण झालेली आहे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागते जिथे माणसांना प्यायला पाणी मिळत नाही तिथे जनावरांचं काय ? भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने भविष्यातील संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेले पशुधनापैकी गाय म्हैस बैल विक्रीसाठी वसमतच्या आठवडी बाजारामध्ये घेऊन आलेले आहेत त्यामुळे वसमच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी आलेल्या जनावरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक शेतकऱ्याकडे चारा नाहीये साठवून करून ठेवलेला चारा किती दिवस पुरणार या भीतीने शेतकरी मिळेल त्या भावाने जनावरांची वसमच्या आठवडी बाजारामध्ये विक्री करू लागले आहेत तर दुसरीकडे बाजारात ओल्या आणि सुक्या या दोन्ही प्रकारच्या चाऱ्याचे भाव सुद्धा वाढले आहेत जो ओला चारा अगोदर दहा ते बारा रुपयाला एक पेंडी याप्रमाणे मिळायचा त्यात चाऱ्याचे भाव वाढल्याने आता तो चारा 20 ते 25 रुपयाला एक पेंडी याप्रमाणे मिळतोय त्यामुळे शेतातील जनावरे सांभाळने कठीण चालल आहे






















