ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 PM : 22 May 2024 : Maharashtra News
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 PM : 22 May 2024 : Maharashtra News
पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलगा बाल न्याय मंडळात हजर, जामीन मिळणार की गजाआड होणार, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अगरवालला पुणे पोलीस आयुक्तालयात नेलं, पोलीस चौकशी करण्याची शक्यता, थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार
पुणे कार अपघातातील अगरवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड, शिवसेना पदाधिकारी अजय भोसलेंच्या हत्येच्या सुपारीसाठी छोटा राजनची मदत घेतल्याचा आरोप
कल्याणीनगर अपघातानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर, कोरेगाव परिसरातील आणखी ३ अवैध पबवर बुलडोझर
इंदापुरात भीमा नदी पात्रात बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली, बेपत्ता सहा प्रवासी दगावल्याची भीती,सुप्रिया सुळे, रणजीत नाईक निंबाळकरांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी
मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी नऊ दिवसांनी एसआयटीची स्थापना, गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्याकडून आदेश जारी तर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर