ABP Majha Headlines : 09 PM : 21 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, जरांगेंची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती, तर निवडणुका घेतल्या तर प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या, जरांगेंचं आक्षेपार्ह आवाहन
मराठा समाजातील वृद्धांनांही आता उपोषणाला बसवणार, वृद्ध आंदोलकाचा मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार ,मनोज जरांगेंचा इशारा
जरांगेंचे माजी सहकारी अजय महाराज बारसकरांची जरांगेवर सडकून टीका, केवळ प्रसिद्धी आणि श्रेयवादासाठी आंदोलन, बारसकरांचा आरोप
अजय महाराज बारसकर सरकारचा ट्रॅप चालवतायेत, सरकारला हे खूप महागात पडेल, मनोज जरांगे यांचा पलटवार
मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांकडून भाजप आमदार आणि खासदारांना सूचना, तर संमेलनात खासदार पूनम महाजन गैरहजर
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला शिंदे गटाला अमान्य..आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, आम्हाला १२ जागांचा फॉर्म्युला मान्य नाही, शिंदे गटाच्या गजानन किर्तिकरांचं विधान
सर्वकाही देऊनही ज्यांनी निष्ठा पाळली नाही त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलीय..दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा, आंबेगाव मतदारसंघातील सभेत शरद पवारांचं मतदारांचा आवाहन,
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणी हायकोर्टात सुनावणी, शरद पवार गटाला हायकोर्टाची नोटीस, ११ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, १४ मार्चपर्यंत सुनावणी तहकूब
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांची शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट, राजकीय चर्चांना उधाण, राजकारण आणि कुटुंब यांची गल्लत नको, युगेंद्र पवारांचं स्पष्टीकरण
काँग्रेसचे सात आणि शरद पवार गटाचे ५ आमदार अजित पवारांच्या संपर्कात, अमोल मिटकरींचा मोठा दावा, लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होणार, मिटकरींचं वक्तव्य
मुलानं बलात्कार केला सांगत पालकांकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न, नागपूरमधला धक्कादायक प्रकार, नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू
कल्याण रेल्वे स्थानकातून ५४ डेटोनेटर जप्त, सरकत्या जिन्याखाली ठेवलेली स्फोटकं बॉम्बशोधक पथकानं घेतली ताब्यात
पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात धडक कारवाई, पुणे दिल्लीसह तीन दिवसात ४ हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, पुण्याच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा