![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Government Officer Protest : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला संप मागे
Government Officer Protest : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला संप मागे एखाद्या व्यक्तीला ‘सरकारी नोकरी मिळाली की आयुष्य सेट होऊन जाईल,’ असं म्हणताना आपण नक्कीच ऐकलं असेल.. एक काळ असाही होता कि मुलाला सरकारी नोकरी म्हटली की लग्नाला मुलगी, मुलीच्या घरचे तात्काळ हो म्हणायची.. त्याला कारणही तसंच आहे.. खासगी कंपन्यांमधली नोकरी ही आव्हानात्मक असते.. तर सरकारी नोकरी ही तुलनेने सुरक्षित मानली जाते.. प्रतिष्ठा, भरपूर वेतनमान आणि निवृत्तीनंतर पेन्शनमुळे सरकारी नोकरीला आजही पसंती आहे..
पण सध्या याच पेन्शनवरून सरकार आणि सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले होते... हिवाळी अधिवेशनात भव्य मोर्चा काढल्यानंतर.. आज राज्यातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीमधील जवळपास १७ लाख कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचं हत्यार उपसलं.. मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह राज्यभरात त्याचे पडसाद उमटलेे.. शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामबंदमुळे सरकारही हललं.. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत जुनी पेन्शन अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत देण्याबाबत, निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली... आणि शंभरहून अधिक आंदोलक संघटनांनी तात्काळ ऑनलाईन बैठक घेतली.. मुख्यमंत्र्यांचं निवेदन, तसंच पेन्शनचा मुद्दा सोडवण्याचे लिखित आदेश आल्यानंतर.. या शासकीय कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी पावणे सात वाजता आपलं कामबंद आंदोलन स्थगित केलं.. आणि सर्वांनीच सुटकेचा दीर्घ श्वास घेतला.. हे आंदोलन स्थगित झाल्यामुळे रुग्णांचे होणारे हाल थांबले ही महत्त्वाची बाब...
![Kailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/26/1fc6264a3757ede7a2f79fdf5b7a3fff1735225188263718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Anjali Damania on Beed | गरज नसलेले बंदुकीचे परवाने रद्द करा, पोलीस खात्याचा दुरूपयोग- दमानिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/26/813d53248ff74201f80b6c4f3416704d1735223954362718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Unique Farmer Id Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार युनिट फार्मर आयडी Abp Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/26/b9c70fe4db8a6b73eb9dcff30522aaf91735220223815718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maitreya Dadashreeji : मैत्रेय संवाद : नव्या वर्षांत कसे करावे स्वत:मध्ये बदल? : 26 December 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/26/dba51068ce5c57b9f74c454b9fc62e3f1735219051927718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 04 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 26 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/26/e2da9c2cb1aebc618fee0b33dba9cd131735210825221718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)