Gopichand Padalkar : कितीही विरोध झाला तरी बैलगाडा शर्यत भरवणार : गोपीचंद पडळकर यांचा एल्गार
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारविरोधात बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून एल्गार पुकारलाय. पडळकर यांनी येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलंय. द्वितीय तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळे बक्षीस देण्यात येणार आहे. राज्यात बैलगाडा शर्यत बंदीचा कायदा लागू असूनदेखील पडळकर यांनी शर्यतीचे आयोजन केले आहे. त्यामुळे ठाकरे सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.























