Gold Price Hike : ऐन सणासुदीच्या काळात सोन्याला झळाळी, सोनं 6 वर्षात दुपटीहून जास्त महाग
Gold Price Hike : ऐन सणासुदीच्या काळात सोन्याला झळाळी, सोनं 6 वर्षात दुपटीहून जास्त महाग
आता बातमी सराफा कट्ट्यावरची... ऐन सणासुदीच्या काळात सोन्याला झळाळी आलीय. शेअर बाजार नवनवे विक्रम करत असतानाही सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाहीय. आज एका तोळ्याचा भाव तब्बल ७८ हजार ५०० रुपयांवर गेलाय. २४ तासांत १ हजार रुपयांची वाढ नोंदली गेलीय. गेल्या सहा वर्षात सोन्याच्या भावात दुपटीपेक्षाही जास्त वाढ झालीय. २०१८ साली सोनं प्रति तोळा ३१ हजार ४३८ रुपये इतकं होतं. आज त्यात ४७ हजारांपेक्षा जास्त वाढ होऊन ते ७८ हजार ५०० रुपयांवर गेलंय. पुढच्या दोन दिवसांत तर सोनं ८० हजार रुपये तोळा असेल असा अंदाज आहे.
सोनं ६ वर्षात दुपटीहून जास्त महाग (प्रति तोळा)
२०१८ - ३१,४३८ रु.
२०१९ - ३५,२२० रु.
२०२० - ४८,६५१ रु.
२०२१ - ४८,७२० रु.
२०२२ - ५२,६७० रु.
२०२३ - ६५,३३० रु.
३ ऑक्टो.२०२४ - ७८,५०० रु.