एक्स्प्लोर

Girish Mahajan : Devendra Fadnavis यांनी राजीनामा दिल्यास गिरीश महाजन उपमुख्यमंत्री? ABP Majha

जळगाव : लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll 2024) समोर आले असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एनडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळणार असून महायुतीला राज्यात फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात महायुतीला (Mahayuti) 22 ते 26 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 23 ते 25 जागांचा अंदाज आहे. यावर आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

गिरीश महाजन म्हणाले की, विविध सर्वे समोर आले आहेत. या सर्वेमध्ये मोदी जी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतीलच, असे दाखविले जात आहेत. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान तर होणारच आहे. शिवाय आम्ही सांगितल्याप्रमाणे चारशे पार सुद्धा करणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.  

राज्यातील एक्झिट पोलवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया 

एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीला फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात आमच्या जागा कमी असल्याचं दाखविले जात असले तरी किमान पस्तीस जागा आम्हाला मिळणार आहेत. उद्या ते तुम्हाला पाहायला मिळेल. राज्यात जागा कमी येत आहेत हे खरे आहे. त्या मागील कारण बघितले तर वाढती महागाई, शेतकरी प्रश्न आणि आरक्षण प्रश्न याचबरोबर काही उमेदवार बदलायला पाहिजे होते ते झाले नाही. यामुळे या जागा कमी होत असल्याचं दिसत असल्याची कबुली गिरीश महाजन यांनी दिली आहे.  

गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंवर निशाणा 

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेले दिसत नाही. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे.  खडसे यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. ते कोणत्या पक्षात आहेत, हे त्यांना ही कळत नाही. ते जे बोलत आहेत ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget