Ghatkoper Marathi Issue | घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी कुटुंबाला अवमानकारक बोलल्याची घटना समोर!
Ghatkoper Marathi Issue | घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी कुटुंबाला अवमानकारक बोलल्याची घटना समोर!
घाटकोपरच्या श्री संभव सोसायटीमध्ये दोन दिवसांपूर्वी येथील मराठी रहिवासी राम रिंगे यांच्यासोबत सोसायटी कमिटीचा वाद झाला या वादामध्ये तुम्ही मराठी आहात मराठी माणसं घाणेरडी असतात तसेच मांसाहार खातात असा आरोप करीत या कुटुंबाला बॉयकॉट करण्याचा प्रयत्न झाला.त्यानंतर मनसेच्या कार्यकर्ते या सोसायटीमध्ये पोहोचले आणि या वादाला तोंड फुटले.या सोसायटीमध्ये एकूण 42 कुटुंब आहेत ज्यामध्ये चार मराठी कुटुंब आहे तर एक उत्तर भारतीय आणि एक मारवाडी कुटुंब आहे गेल्या वर्षी या सोसायटीचे इलेक्शन झाले त्यानंतर मराठी विरुद्ध गुजराती असा वाद या सोसायटीत रंगू लागला महत्त्वाचं म्हणजे या सोसायटीच्या व्हाट्सअप ग्रुप वर मराठी कुटुंबाच्या विरोधात पोल घेऊन त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप इथल्या मराठी कुटुंबीयांनी केला आहे. मात्र मराठी माणसावरील हा अन्याय सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया मनसेचे राज पार्टे यांनी दिली आहे.
रहिवासी संकुलामध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा वाद घाटकोपरमध्ये काही नवा नाही याआधी देखील एका उच्चभ्रू रहिवासी सोसायटीमध्ये देखील आवाद पेटलेला पाहायला मिळाला या सोबतच घाटकोपर पूर्वेकडे गुजराती पाट्यांचा वाद देखील निघायला होता. मुंबई आणि उपग्रहांमध्ये सध्या भाषिक आणि जातीय तणाव दिसून येतोय सध्या या प्रकरणात पोलीस आणि सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या सोसायटीचे चेयरमन सतीश गोरे यांनी या प्रकरणनंतर मराठी माणसावर असे काही झाले असेल तर कारवाई करू अशी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला असत, मनसे आक्रमक झाली आणि या चेयरमन वर धावून गेली असत त्याला पळ काढावा लागला.






















