![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ganpatrao Deshmukh passes away : गणपतराव देशमुखांना कार्यकर्त्यांचा लाल सलाम; समर्थकांना अश्रू अनावर
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर आज सोलापुरातील सांगोल्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या पेनूर या जन्मगावी ठेवण्यात आलं. यावेळी देशमुख यांच्या अंत्यदर्शनासाठी ग्रामस्थ आणि समर्थकांनी गर्दी केली. सांगोल्यात देशमुख यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्यातील विविध पक्षाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर हजारो कार्यकर्ते जोडले. त्यांच्या राजकारणातल्या यशस्वी कारकीर्दीचं तेच गमक होतं. अत्यंत साध्या राहणीमुळं सर्वसामान्य माणसांना ते नेहमीच आपले वाटत. गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघातून त्यांनी तब्बल अकरावेळा विक्रमी विजय मिळवला. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा हा विक्रम त्यांच्याच नावावर आहे.
गणपतराव देशमुखांच्या निधनानं त्यांची कर्मभूमी सांगोलावर शोककळा पसरली आहे. आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली
![City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/11/f726f5e4b3a502cebb5d6f37cd486402173393447557190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 09 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/11/77bd6a27787e6ed1988ea03afee71dea173393341605790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 08 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/11/5b68176fd463e80cb77343d31798733e173393045908590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast News : 11 December 2024 : दिवसभरातील सुपरफास्ट बातम्या : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/11/3aa34a66b88fa9353d15965474597368173392970854190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Beauty Parlour And Salon Rates : नव्या वर्षात सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्च वाढणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/11/5a1c5b9aab1403d41c5da6c27a980e9d173392861841990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)