Hingoli Ganpati Festival : झाडापासून साकारला गणपती, विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद उपक्रम : Marathi News
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये लिटल इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त वेगळा उपक्रम राबवत असतात, त्याप्रमाणे याही वर्षी ह्या विद्यार्थ्यांनी झाडापासून गणपती साकारला आहे. या गणपती मंडळाचे नाव ते म्हणजे निसर्ग गणेश मंडळ दररोज या मंडळाच्या वतीने निसर्गा विषयी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत आज या गणेश मूर्तीची निर्मिती करून या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. श्री गणेश मूर्ती निसर्ग पूरक आणि प्रदूषण विरहित त्याचबरोबर झाडांच्या वेगवेगळ्या भागाचा वापर करून या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे निसर्गाचे आणि झाडांचे वेगळे महत्त्व या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न आहे.




















