Ganeshotsav 2021 : चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल, खारेपाटण चेकपोस्टवरुन 'माझा'चा आढावा
कोकणाचा लाडका सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण, करूळ आणि आंबोली याठिकाणी जिल्याच्या सीमेवर जिल्हाबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना सीमेवर महसूल विभागाकडून नोंदी घेतल्या जातात तर रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांच्या नोंदी रेल्वे स्टेशनला ठेवल्या जात आहेत. खारेपाटण मध्ये खाजगी गाड्यांची गर्दी पहायला मिळत आहे. खारेपाटण मध्ये खाजगी गाड्यांची गर्दी पहायला मिळत आहे. खारेपाटण मध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी केली जाते त्यामुळे गर्दीवर नियोजन मिळवण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्या प्रशासनाला यश आलं आहे.


















