एक्स्प्लोर

Gudi Padwa 2026: यंदा गुढीपाडवा सणावर अमावस्येचं सावट? 19 कि 20 तारखेला सण साजरा करावा? गुढी कधी उभारायची? ज्योतिषी सांगतात...

Gudi Padwa 2026: हिंदू पंचांगानुसार, गुढीपाडव्याबाबत काही तांत्रिक गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः अमावस्येचे सावट आहे की नाही, याबाबत डॉ भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Gudi Padwa 2026: गुढीपाडवा... मराठी नववर्षाची सुरूवात...ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो दिवस लवकरच येत आहे, धार्मिक मान्यतेनुसार, गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे, जो विविध राज्यात विविध नावांनी साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. या दिवशी शुभकार्याला सुरूवात, सोने-चांदी, वाहन, घर खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे, यंदा गुढीपाडवाच्या सणावर अमावस्येचं सावट असणार का? गुढी कधी उभारायची? याबाबत अनेकांच्या मनाता प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत डॉ भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घ्या...

गुढीपाडव्याला अमवास्येचं सावट?? (Gudi Padwa 2026)

हिंदू पंचांगानुसार, गुढीपाडव्याबाबत काही तांत्रिक गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

विशेषतः अमावस्येचे सावट आहे की नाही, हे स्पष्ट होईल 

गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. नियमानुसार, ज्या दिवशी सूर्योदयाला प्रतिपदा तिथी असते, त्याच दिवशी पाडवा साजरा होतो.

अमावस्या ही फाल्गुन महिन्याचा शेवटचा दिवस आहे.

प्रतिपदा ही चैत्र महिन्याचा पहिला दिवस आहे.

'सावट' नेमके काय असते?

डॉ भूषण ज्योतिर्विद सांगतात, कधीकधी प्रतिपदा तिथी ही दुपारी किंवा उशिरा सुरू होते आणि त्यापूर्वी काही काळ अमावस्या असते. अशा वेळी....

ब्रह्मध्वज (गुढी) उभारण्याची वेळ: शास्त्रानुसार, गुढी ही सूर्योदयानंतर लगेच किंवा शुभ मुहूर्तावर उभारली जाते. जर सूर्योदयावेळी प्रतिपदा असेल, तर अमावस्येचा कोणताही दोष मानला जात नाही.


खंडित तिथी: जर सूर्योदयाला अमावस्या असेल आणि काही तासांनी प्रतिपदा लागत असेल, तर पंचांगकर्ते ज्या दिवशी सूर्योदयाला प्रतिपदा आहे, तोच दिवस पाडव्यासाठी निश्चित करतात.

2026 ची गुढीपाडवा सणाची योग्य तिथी, अमावस्येचं सावट आहे की नाही?

2026 मध्ये गुढीपाडवा 19 मार्च रोजी आहे.
अमावस्या समाप्ती: 18 मार्च 2026 रोजी रात्री : पहाटे उशिरा अमावस्या संपते.
प्रतिपदा प्रारंभ: 19 मार्चला सूर्योदयापूर्वीच प्रतिपदा तिथी सुरू झालेली असेल.
2026 च्या गुढीपाडव्यावर अमावस्येचे सावट नाही. 
19 मार्चला सूर्योदयाला प्रतिपदा तिथी असल्याने तोच दिवस अत्यंत शुभ आणि गुढी उभारण्यासाठी योग्य आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीलाही सुरूवात!

गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात. तसेच, ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते. ज्योतिषांच्या मते, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्याच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढते.

-डॉ भूषण ज्योतिर्विद

हेही वाचा>>

Gudi Padwa 2026: गुढीपाडवा अन् चैत्र नवरात्रीचा अद्भूत योगायोग! 4 राशींचा संपत्ती, उत्पन्नाचा मार्ग मोकळा, ग्रहांचा पॉवरफुल संयोग, वर्षभर भरभराट....

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Dev : शनिच्या महादशेत 'या' राशींच्या लोकांना होतो सर्वाधिक त्रास; तब्बल 19 वर्ष भोगावी लागतात कर्माची फळं, तुमची रास कोणती?
शनिच्या महादशेत 'या' राशींच्या लोकांना होतो सर्वाधिक त्रास; तब्बल 19 वर्ष भोगावी लागतात कर्माची फळं, तुमची रास कोणती?
Shubh Yog 18 April 2026 : अनफा आणि वेशी योगासह जुळून आले शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव, घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा
अनफा आणि वेशी योगासह जुळून आले शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव, घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा
Horoscope Today 18 April 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 18 April 2026: आज शनिवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच संकटातून मुक्ती, आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच संकटातून मुक्ती, आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Scholarship Exam : राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षण परीक्षा परिषदेच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
Women's reservation Bill Shivsena Priyanka Chaturvedi: प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
त्या मादक मॉडेलच्या फोटोवर विराट कोहलीच्या एका लाईकने सोशल मीडियावर गदारोळ, अनेकांनी केलं ट्रोल, नक्की काय घडलं?
त्या मादक मॉडेलच्या फोटोवर विराट कोहलीच्या एका लाईकने सोशल मीडियावर गदारोळ, अनेकांनी केलं ट्रोल, नक्की काय घडलं?
Mumbai Crime News: महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
Akola : संतापजनक! गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत चक्क मेलेलं माकड सापडलं; त्याच टाकीतून गावकऱ्यांना चार दिवस दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
संतापजनक! गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत चक्क मेलेलं माकड सापडलं; त्याच टाकीतून गावकऱ्यांना चार दिवस दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
Ahilyanagar Crime News: संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार
संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार
Embed widget