एक्स्प्लोर

Gadchiroli : उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं ; पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्याशी बातचीत

गडचिरोली : उत्तर गडचिरोलीमध्ये गुरुवारी रात्री आणि शुक्रवारच्या सुमारास झालेल्या एका मोठ्या कारवाईमध्ये गडचिरोली पोलिसांच्या पथकातील सी-60 तुकडीला मोठं यश मिळालं. तेंदू पत्ता संकलनासाठीच्या बैठकीचं आयोजन नक्षलवाद्यांनी छत्तीसगड सीमेनजीकच्या एका गावापाशी केलं होतं. याबातची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकानं ही कारवाई केली. याची माहिती पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना दिली. पोलिसांनी केलेल्या या धडाडीच्या कारवाईमध्ये तब्बल 13 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 

ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या 13 दहशतवाद्यांवर एकत्रितपणे तब्बल 60 लाख रुपयांचं बक्षीस शासनातर्फे जाहीर करण्यात आलं होतं. 

'पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी सी 60 जवानांचं पथक रवाना करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी ऑपरेशन सुरु केल्यानंतर तिथे लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी लगेचच सावध होत गोळीबार सुरु केला. पोलिसांनीही या गोळीबाराचं प्रत्युत्तर दिलं. जवळपास तासभर गोळीबार चालला आणि ज्यानंतर इथे शोधमोहिम हाती घेतली असता पोलिसांना या चकमकीत मारल्या 13 नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले', अशी माहिती गोयल यांनी दिली. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही मिळाला. यामध्ये एके 45, 5 एसएलआर, टर्बाईन आणि इतरही शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.  

उत्तर गडचिरोली भागात कसनसुर नक्षल दलम कार्यरत होतं, ज्याचा कमांडरही मारला गेल्यामुळे आता या दलमचं कंबरडं मोडलं गेलं आहे. पोलीस पथकाच्या या कारवाईला मोठं यश मिळाल्यानंतर पोलीस दलातील बँड पथकाकडून सी-60 जवानांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं.

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget