Osmanabad :योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्याचा संताप, 2 एकरातील कोथिंबीरीवर फिरवला Tractor :ABP Majha
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी येथील एका शेतकऱ्यांने कोथिंबिरीची विक्री होत नसल्याने वैतागून दोन एकर कोथिंबीर पिकात चक्क ट्रॅक्टर फिरवला. भाव नसल्याने शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. महिनाभरापासून लोहारा परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे उडीद, मूग आणि सोयाबीन पीक रानातच करपून गेले आहे. अशा परिस्थितीत पालेभाज्यांनाही अपेक्षीत भाव मिळेनासा झाला आहे . कोथिंबीरची विक्री होत नसल्याने दक्षिणजेवळी येथील शेतकरी दत्तात्रय होनाजे या शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रातील कोंथिबीर पिकावरती चक्क ट्रॅक्टर फिरविले असून, यामुळे या शेतकऱ्यांला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. मुंबई बाजारपेठ बंद असून, हैदराबाद बाजारपेठेत भरपूर कोंथिबीर आहे. पुणे, नागपूर इथेही मालाला उठाव नाही.





















