Eknath Shinde Vidhan Parishad Speech : त्यांच्या नावात राम आहे, ते रामासारखं काम करतील- शिंदे
Eknath Shinde Vidhan Parishad Speech : त्यांच्या नावात राम आहे, ते रामासारखं काम करतील- शिंदे
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2024) आज चौथा दिवस आहे. विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत सर्व नेत्यांनी राम शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना सभापतीपद द्यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. पण भाजपने हे पद शिवसेनेला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर भाजपकडून महाराष्ट्र विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी राम शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले. आज त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सभापती पदासाठी श्रीकांत भारतीय यांनी प्रस्ताव मांडला. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी सभापती म्हणून एकमताने राम शिंदे यांना निवडण्यात येत असल्याचे जाहीर केले.