एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde फडणवीसांच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला, शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत उद्धव ठाकरेंवर तीव्र टीका केली. ज्या पक्षाला 'संपलेला पक्ष' म्हटले, त्यांच्यासोबत जाण्याची वेळ ठाकरेंवर आल्याचे शिंदेंनी नमूद केले. देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आणि त्यांचे फोन न घेतल्याचा आरोप शिंदेंनी केला. 'केलेलं कर्म शेवटी इथेच पेडावं लागतं' असेही ते म्हणाले. ठाकरेंच्या अनेक बैठकांमधील माहिती आपल्याला असल्याचे आणि शरद पवारांनीही खूप काही सांगितल्याचे शिंदेंनी उघड केले. शिवसेना-भाजपाला जनतेने कौल दिला असतानाही जनतेच्या मतांची माती कोणी केली, असा प्रश्न त्यांनी विचारला. निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी चाळीस-पन्नास फोन केले, पण एकही उचलला गेला नाही. फडणवीसांनी अर्धा तास विचार करून महापौरपद शिवसेनेला दिले. 'एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन' अशी टोकाची भाषा वापरली गेली. महाराष्ट्राने इतक्या लवकर रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही, असे शिंदेंनी म्हटले. गुवाहाटीला असतानाही आपल्याला फोन आणि निरोप येत होते, तर दुसरीकडून दिल्लीत संधान साधले जात होते, असे शिंदेंनी सांगितले. 'गद्दारी आम्ही नाही केली' असे शिंदेंनी स्पष्ट केले. आठ मंत्री आणि पन्नास आमदार गेले, सत्तेतून आम्ही बाहेर पडलो आणि सत्ता सोडली, असे शिंदेंनी नमूद केले. पवार साहेबांनी देखील आपल्याला काही गोष्टी सांगितल्या आहेत, असे शिंदेंनी पुन्हा सांगितले.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा






















