Eknath Shinde on Vaibhav Naik : वैभव नाईक शिंदे गटात येणार? मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
Eknath Shinde on Vaibhav Naik : वैभव नाईक शिंदे गटात येणार? मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
दस्तुरखुद्द वैभव नाईकांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. राज्यातल्या इतर भागांमधल्या जबाबदारीला मला न्याय देता यावा, यासाठी नेतृत्वानं हा निर्णय घेतल्याचा दावा नाईकांनी केला आहे. शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि एसीबी चौकशीचा ससेमिरा या पार्श्वभूमीवरही नाईक उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले आहेत. त्यानंतरही ठाकरे गटाकडून संदेश पारकर, सतीश सावंत आणि संजय पडते यांच्याकडे अनुक्रमे सावंतवाडी, कणकवली आणि कुडाळच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळंच वैभव नाईक यांना जिल्हाप्रमुखपदावरून दूर करण्याबाबत उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे.

















