Ekanth Shinde vs Sanjay Raut : एकनाथ शिंदेंनी पाठवली संजय राऊतांना मानहानीची नोटीस
मुंबई : Eknath Shinde Notice To Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना शिवसेनेनं नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने त्यांच्या वकिलामार्फ संजय राऊतांना ही मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराच या नोटीसमधून देण्यात आला आहे. दरम्यान, सामनामधील रोखठोकमधून संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर (Eknath Shide) आरोप केले होते. त्याचसंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याचं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे।, असे म्हणत ही नोटीस पॉलिटीकल फनी डॉक्युमेंट असल्यांचही राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार आणि सामना वृत्तपत्राचे संपादक असलेल्या संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून रोखठोक भूमिका मांडली होती. यावेळी, त्यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना, महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलं. तसेच, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरुन, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती. गांजा पिऊन लेख लिहिणाऱ्यांवर मी बोलत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता एकनाथ शिदेंकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/ffa7d7242ee53b092be7dc827efbbf7217372233987331000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/ecd648c4969e669ce18a7537fc46f82917372204919121000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/d0b079886ba736a34fa8d2dba1f432d217372157996621000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/37c88d18f4b2accd3b1c823af00b7c3517372118333911000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ladki Bahin Yojana Update : अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत देणार का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/5277c3c3781f66020bc6f14fd242eca017372088162981000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)