Eknath Shinde: महाविकास आघाडीत कुणाची मनं दुखावणार नाहीत याचा विचार करुन बोलावं- एकनाथ शिंदे
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महानगर पालिका निवडणूका येत्या एप्रिल मध्ये होण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे या निवडणूकीत महाविकास आघाडी व्हावी अशी इच्छा राष्ट्रवादीची असली तरी शिवसेना मात्र याला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. सेनेने अहंकारपणा न सोडल्यास ठाणे जिल्ह्या हातातून जाईल असे सांगत एकनाथ शिंदे यांना डिवचले होते. आव्हाड यांच्या आरोपाला एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर देत शिवसेना फायदा - तोट्याचा विचार करीत नसल्याचा पलटवार केला आहे. नेत्यांनी बोलताना महाविकास आघाडी मधील कुणाची मने दुखावणार नाहीत याचा विचार करावा असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलाय….













