एक्स्प्लोर

Marathwada Flood compensation: हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज, मुख्यमंत्र्यांचा दावा, एकनाथ शिंदे म्हणाले, पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं!

Marathwada Flood compensation: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारची मोठी मदत. खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 3.50 लाख देण्यात येणार आहेत. एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Marathwada Flood compensation: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झाले आहे. आम्ही इतका मोठा पाऊस कधीही पाहिला नव्हता. आम्ही बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.  जवळपास 65 लाख हेक्टर जमीन नुकसानग्रस्त आहे. अशा काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. विरोधक शेतकऱ्यांना (Farmers) एवढं पॅकेज द्या, तेवढं पॅकेज द्या सांगत होते.  आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा शब्द दिला होता. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तामिळनाडू आणि पंजाबपेक्षा मोठे पॅकेज (Marathwada Compensation Package) दिले आहे. आम्ही शेतकऱ्यांना अधिकाअधिक मदत देण्याचा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील लाखो हेक्टर जमिनीवरील पिकं आडवी झाली आहेत. जमिनी कापल्या गेल्या आहेत. पशुधन वाहून गेले आहे, जीवितहानी झाली आहे. अशा प्रसंगात शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता होती. ही मदत अंतिम नाही. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलू नये. शासन खंबीरपणे आपल्या पाठीमागे उभे आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. 

सर्व निकष बाजूला ठेवत आम्ही शेतकरी केंद्रबिंदू ठेवला आहे. जे जे उपाय करता येतील ते आम्ही करणार आहोत. कितीही आर्थिक ओढाताण असली तरी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पिकांच्या नुकसानीसाठी आम्ही एनडीआरएफ व्यतिरिक्त अतिरिक्त 10 हजार रुपयांची मदत करणार आहोत. अमित शाह आले तेव्हा त्यांना विनंती केली, केंद्राची मदत देखील झाली पाहिजे, असं सांगितले.  महाराष्ट्र सरकारच्या मागे केंद्र सरकार उभं राहिले. यावेळचं संकट बघत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. ज्या पद्धतीचे नुकसान झाले आहे त्यात मदतीचा हात सरकार देईलच,  सरकार हात आखडता घेणार नाही. शेतकरी सन्मान योजना त्यांनी सुरु केली आणि आपणही केली. शेतकरी आपला मायबाप आहे, त्याचे अश्रू पुसण्याचे काम आपण करु. पूर्णपणे शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभं राहू, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जनावरे आणि घरासाठीही मदतनिधी (marathwada farmers package)

दुधाळ जनावरांना 37 हजार रुपयांपर्यंत मदत 

गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार  

कुकुटपालनाला 100 रुपये प्रति कोंबडी 

नष्ट, पडझड झालेली घरं नव्याने  बांधण्यासाठी मदत

डोंगरी भागातील घरांना 10 हजारांची अधिकची मदत  

झोपड्यांची मदत, गोठा, दुकानदार यांना 50 हजार मदत करणार

विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी करणार 

आणखी वाचा

मोठी बातमी : खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 3.50 लाख; अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटीचं पॅकेज जाहीर

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Embed widget