Eknath Khadse On Mahayuti : महायुतीचं सरकार जावं; मविआचं सरकार यावं;खडसेंचं मोठं वक्तव्य
Eknath Khadse On Mahayuti : महायुतीचं सरकार जावं; मविआचं सरकार यावं;खडसेंचं मोठं वक्तव्य
हेही वाचा :
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मित्रपक्षांमध्ये असलेली धुसफूस दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाबद्दल बोलल्यानंतर महायुतीत सुरू असलेली अंतर्गत धुसफूस दिसून येत आहे. अशातच काल(शुक्रवारी) शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अजित पवार हाताळत असलेल्या अर्थखात्याबाबत धक्कादायक विधान केलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अशी टीका करणे योग्य नाही. पण, अशी टीका करुन महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढून शिवसेनाला जास्त जागा महायुती मिळाव्या असा काही त्यांचा प्लॉन असेल असंही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीतील विशेषत शिवसेनेचे नेते अजित पवार यांच्यावर वारंवार बोलताना दिसत आहेत. अशातच काल (शुक्रवारी) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अर्थखात्याबाबत धक्कादायक विधान केलं त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही असं गुलाबराव पाटील म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली.