Eknath Khadse:Devendra Fadnavis यांच्यासोबत शत्रुत्व नाही,व्यक्तिगत संबंध चांगले,खडसेंचे सूर बदलले?
Eknath Khadse:Devendra Fadnavis यांच्यासोबत शत्रुत्व नाही,व्यक्तिगत संबंध चांगले,खडसेंचे सूर बदलले?
ज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसे पक्षाला सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला निश्चितच रस आणि आनंद आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या अभिनंदनाचे आणि विधायक उपक्रमांना पाठिंबा असल्याचे ट्विट केले होते. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसेबाबत सकारात्मक आणि आशादायक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी 'सह्याद्री' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.त्यानंतर आता भाजप आणि मनसे सोबत येणार का याबाबतच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर आता भाजप मनसे एकत्रित येणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. भाजपने हात पुढे केल्यास मनसे देखील सोबत येण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप मनसे एकत्र येण्यासंदर्भात मनसे देखील सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे, भाजपकडून याबाबतचा प्रस्ताव आल्यास निश्चित विचार होईल अशी माहिती समोर येत आहे.