TAUKTAE : चक्रीवादळामुळे उद्या,परवा मुंबईत लसीकरण बंद,जम्बो कोविड सेंटरच्या रुग्णांचं स्थलांतर होणार
सिंधुदुर्ग : अरबी समुद्राच्या आग्नेय भागात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होऊन त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊन 18 मे च्या दरम्यान ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 ते 17 मे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर येऊन आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात या काळात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.






















