Sanjay Raut vs Nitesh Rane : ड्रग्जच्या मुद्यावरुन सरकारला घेरलं, नितेश राणे - संजय राऊत आमने-सामने
उडता पंजाब हा अनुराग कश्यपचा गाजलेला चित्रपट. पंजाबमधील ड्रग्जच्या समस्येचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं होतं. त्यालाच धरून, उडता पंजाबसारखं उडता महाराष्ट्र करायचा का, असा सवाल विरोधक विचारू लागले आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयात ड्रग्जचं रॅकेट चालवणारा आरोपी ललित पाटील हा सध्या फरार आहे. कालच पुणे पोलिसांनी ललित पाटीलसोबत असलेल्या साथिदारांना अटक केली. ललित पाटीलवरुन ठाकरे गटाने दादा भुसेंवर हल्लाबोल केलाय. त्यामागे कारणही तसंच आहे.. ललित पाटील याने २०१६ साली उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला.. यावेळी दादा भुसेही उपस्थित असल्याचं फोटोतून समोर आलं.. त्यामुळे सेनेत प्रवेश करतानाचे फोटो व्हायरल झाल्यावर तर ठाकरे गटाने दादा भुसेंना चांगलेच घेरलं..दरम्यान ठाकरे गटाच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उडता महाराष्ट्राचा प्रमुख मातोश्रीवर राहात असल्याचा टोला राणेंनी राऊतांना लगावलाय.