एक्स्प्लोर
Security Guard Child Assault: Dombivli च्या Palava मध्ये मुलांचे हात बांधून मारहाण, Guard ला अटक
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील पलावा सोसायटीमध्ये इमारतीच्या खाली फुटबॉल खेळत असलेल्या मुलांना सुरक्षा रक्षकाने मारहाण केली. इमारतीत बॉल शिरल्याने सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याने मुलांना पकडले. त्याने मुलांचे हात बांधले, त्यांना बेदम मारहाण केली आणि शिवीगाळ केली. तसेच मीटररूममध्ये बंद करण्याची धमकी दिली. एका मुलाने स्वतःची सुटका करून पालकांना माहिती दिली. पालकांनी विचारणा केली असता सुरक्षा रक्षकाने अरेरावी केली. पालकांनी सुरक्षा रक्षक दारू प्यायला असल्याचा आरोप केला. पोलिसांनी राजेंद्र खंदारे याला अटक केली असून बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पालकांनी सोसायटीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका पालकाने म्हटले आहे की, “सिक्युरिटी गार्ड अकेले तो नहीं कर सकता। किसी ना किसी ने इसको परमिशन दिया। किस किसने दिया वो मुझे मालूम नहीं है लेकिन बिना परमिशन के सिक्युरिटी गार्ड ऐसा नहीं कर सकता।” रहिवाशांच्या मते, सुरक्षा रक्षकाने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
Advertisement


















