Dhule Rain : धुळ्यात काढणीला आलेल्या पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचंही नुकसान
Dhule Rain : धुळ्यात काढणीला आलेल्या पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचंही नुकसान
धुळे शहरासह जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर परिसरात काल अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे यामुळे पिकांचे लाख रुपयांचे नुकसान झाले असून या पावसामुळे काढणीवर आलेले पिकांचे नुकसान झाले आहे तसेच जनावरांसाठी साठवलेल्या चारा पिकाचेही मोठे नुकसान झाले असून यामुळे हातात तोंडाशी आलेला खास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांच्या संकटात वाढ झाली आहे, एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी मतदान बाकी असून, यामुळे या नुकसानीचे पंचनामे होण्यास उशीर होणार आहे... शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई नेण्यासंदर्भात पाऊले उचलावीत अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.... धुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे.