Dhule : धुळेकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट, नकाणे तलावात फक्त 75 दिवसांचा जलसाठा : ABP Majha
धुळे शहरासह जिल्ह्यात एकीकडे गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील जल प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा निर्माण झाला नाहीए. त्यामुळे धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात पुढील 75 दिवस पुरेल इतकाच जलसाठा सध्या शिल्लक आहे. धुळे जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असून पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्यास धुळेकर नागरिकांवर पाणीकपातीचं संकट येऊ शकतं. नकाणे तलावात हरणमाळ तलावातून जलसाठा विसर्जित केला जातो. पण या तलावातील जलसाठा देखील घटलाय. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस धुळेकर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय.























