Dhananjay Munde On Onion : धनंजय मुंडे घेणार केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांची भेट : ABP Majha
कांदा निर्यातशुल्कावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आज दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्कामुळे राज्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झालेत. आर्थिक उलाढाल थांबलीय. मुख्य म्हणजे शेतकरी आणि व्यापारी संतप्त झालेत. आणि राज्यातील राजकारण ढवळून निघालाय. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीतून कांद्यावरील निर्यातशुल्क वाढवण्याचा निर्णय मागे घेणार का, याकडे कांदा उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांसह राज्याचं लक्ष लागलंय























