Devendra Fadnavis : Sharad Pawar कृषीमंत्री असताना दोन वेळा कांद्यावर निर्यात बंदी लावली होती
नाशिक : केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली असल्याने, कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभा होत आहे. याच सभेतून पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नसून, कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. तसेच, कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे. आम्हाला रस्त्यावर येण्याची हौस नाही, पण, रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, असेही शरद पवार म्हणाले.























