Devendra Fadnavis Speech Manifesto: शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना; फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis Speech Manifesto: शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना; फडणवीसांची घोषणा
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. भाजपने (BJP) या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' असे नाव देण्यात आले आहे. भाजपच्या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना-
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी भाजपकडून 'भावांतर योजने'ची घोषणा केली. कापूस सोयाबीनचे भाव पडल्यावर भावांतर योजनेतून पैसे दिले आहेत. एमएसपीशी समन्वय साधत 20 टक्क्यांपर्यंत भावांतर योजन राबविण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.