Devendra Fadnavis : मराठा समाजाला पटेल असं आरक्षण देणार - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : मराठा समाजाला पटेल असं आरक्षण देणार - देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये चांगले नेते येत असतील आणि ते जय श्रीराम म्हणणार असतील तर आम्ही का थांबवू असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. लोकमत समूहाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, पण जागावाटपावर ते ठरणार नाही, आमचे पक्षश्रेष्ठी तो निर्णय घेतील असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीवर देखील त्यांनी भाष्य केलं. भाजप-मनसे युती होते का हे तुम्हाला लवकरच कळेल, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणावरही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय. जरांगेंना पटेल अथा नाही पटणार, पण मराठा समाजाला पटेल असं आरक्षण देणार असल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं.





















