Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून अभिजीत पाटलांच्या आमदारकीचे संकेत
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून अभिजीत पाटलांच्या आमदारकीचे संकेत राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातील लढतींपैकी एक असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे..धैर्यशील मोहिते पाटलांनी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माढ्यात अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळाले. त्यातच, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने येथील राजकीय गणितं आणखी बिघडली.. पंढरपूर येथील जाहीर सभेतून देवेंद्र फडणवीसांनी अभिजीत पाटलांच्या कार्यक्षमतेचं कौतुक करत, विधानसभेच्या तयारीला लागण्याचेही संकेतही दिले आहेत. तसेच, कारखान्याच्या अडचणीचा आणि कर्जाचा प्रश्न पुढील ३ ते ४ महिन्यात मार्गी लागेल, असे आश्वासनही दिले.


















