Devendra Fadanvis Wardha : वो आये मेरे मजार पर मिट्टी झाड के बैठ गये.., फडणवीसांची शेरोशायरी
Devendra Fadanvis Wardha : वो आये मेरे मजार पर मिट्टी झाड के बैठ गये.., फडणवीसांची शेरोशायरी
- ज्या मागण्या आर्वी साठी आमदारांनी, खासदारांनी केल्या आहे त्यावर मला विचार करावाच लागेल - उपसा सिंचन योजनेच्या फाईलवर सही मी करून येथे आलो आहे, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे - नवीन रस्त्यामुळे कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली जाईल - रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर आहे - विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे - जवळपास डाओस येथील दौऱ्यानंतर 7 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. - भविष्यात वर्धा जिल्ह्यासाठी गुंतवणूक फायद्याची आहे - नेरी मिर्झापुर गावाला संपूर्ण सौर ऊर्जा देण्यात आली आहे, या गावकऱ्यांचे अभिनंदन करतो - शेतकऱ्यांना दिवसभर शेतीसाठी वीज देऊ अशी घोषणा केली होती, 80 टक्के महाराष्टात आता लवकरच दिवस दहा तास वीज उपलब्ध करून दिली जाईल - विहीर पुनर्भरण ही योजना जर हातात घेतली तर त्याचा फायदा होईल, विहिरींची पातळी वाढेल, आपण जर असाच उपसा करीत राहिलो तर आपलाही प्रदेश रेगीस्थान झाल्याशिवाय राहणार नाही - महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बिन कमी होणार आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना दिलासा मिळणार आहे, महाराष्ट्र देशात पाहिलं राज्य ठरलं आहे, की ज्या राज्याने विजेचे बिल दर पाच वर्षांनी कमी करून दाखवले आहे - लोअर वर्धा प्रकल्पावर पाचशे मेगा व्याट वीज निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे - वर्धा जिल्हा सौर उर्जेच्या बाबतीत पूर्णतः स्वयंपूर्ण होईल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शिवराजसिंग चौहान यांनी प्रत्येकाला घर देण्यासाठी पाऊल उचलले - घराकरिता दोन लाख रुपये मिळतील हा निर्णय आपण केला आहे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रत्येक घरावर सोलर लागेल त्यामुळे मोफत वीज मिळेल - या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या आहे, त्यासाठी एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊ - मी पण वर्धा जिल्ह्याचा काही काळासाठी पालकमंत्री होतो त्यामुळे विशेष लक्ष आहे






















