एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Defender Row: 'दीड कोटींची गाडी कोणत्या कामातील कमिशनमुळे मिळाली?', BJP नेते Vijay Shinde यांचा सवाल
बुलडाण्यामध्ये दीड कोटींच्या डिफेंडर गाडीवरून शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (Vijay Shinde) यांच्यात नवा वाद पेटला आहे. 'दीड कोटीच्या डिफेंडर गाडी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे, ती कोणत्याही कामातील कमिशनमुळे लोकप्रतिनिधीला मिळाली का?' असा थेट सवाल विजय शिंदेंनी उपस्थित केला आहे. या आरोपांवर उत्तर देताना, ती गाडी आपली नसून एका नातेवाईकाची आहे आणि ती 100 टक्के कर्जावर घेतली आहे, असे स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिले आहे. या प्रकरणात संभाजीनगरमधील नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याकडेही अशा महागड्या गाड्या असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, या वादात उडी घेत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे साहेबांच्याच सहकारी पक्षाच्या नेत्याची गाडी कुठल्यातरी कंत्राटदाराच्या नावावर असेल, असा टोला लगावला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















