Dasara Melava 2023 : दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांची मुंबईत गर्दी, कार्यकर्त्यांचा उत्साह
Dasara Melava 2023 : दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांची मुंबईत गर्दी
मुंबई : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर आणि शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि निवडणूक चिन्ह गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena UBT) यंदा पहिलाच मेळावा होत आहे. येत्या काही महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होत असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांचे मुख्य भाषण असलेल्या या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाकडून कोणते शिलेदार भाषण करणार, याची उत्सुकता लागली आहे. ठाकरे गटांच्या वक्त्यांच्या नावाची यादी समोर आली आहे. ही यादी जवळपास निश्चित असल्याचे समजले जात आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे भाषण करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा यंदा पहिलाच मेळावा होत आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची अपात्रता प्रकरणी आलेला निकाल, निवडणूक आयोगाने शिंदे गटाला निवडणूक चिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात भाजप-शिंदे सरकारसह केंद्र सरकारवरही टीका होण्याची शक्यता आहे.