Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारची आधी कंपासमधील कटरनं वार, नंतर दगडाने ठेचून हत्या
दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी बाब समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरेनं दर्शनाच्या गळ्यावर आधी कंपासमधीस कटरनं वार केले, आणि नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती राहुलनं त्याच्या कबुलीजबाबात दिल्याचं समजतंय. विवाहास नकार दिल्यानं राजगडाच्या पायथ्याशी त्यांच्यात वादावादी झाली, राग अनावर झाल्यानं राहुलनं आधी तिच्या गळ्यावर कंपासमधील कटरनं तीन ते चार वार केले, त्यानं तिच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. नंतर त्यानं बाजूचा दगड उचलून तिच्या डोक्यावर जीवघेणा वार केला. दर्शनाची हत्या करण्याचा माझा हेतू नव्हता, रागाच्या भरात माझ्या हातून हा गुन्हा घडला, असा दावा राहुलनं केला आहे.





















