एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'जागा वाटपात अपेक्षित स्थान न मिळाल्यास स्वबळावर लढू', Dhule मध्ये शिंदे गटाचा महायुतीला इशारा
धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्येच समन्वयाचा अभाव दिसत असून शिंदे गट आणि अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. 'जागा वाटपात अपेक्षित स्थान न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे.' तर दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी दर्शवली आहे. याउलट, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिकच रंजक झाली आहेत. जिल्ह्यात पाच आमदार असल्याने महायुतीसाठी अनुकूल वातावरण असले तरी, घटक पक्षांमधील ही रस्सीखेच पाहता ऐनवेळी वेगळी समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















