एक्स्प्लोर
Sanjay Raut MVA MNS PC: 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा मुंबईत विराट मोर्चा
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मुंबई मेट्रो स्टेशनच्या कॉर्पोरेट ब्रँडिंगवरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'त्याच्यामुळे हा नाही तो नाही असे बातम्या येऊ नये', असा थेट इशारा देत सावंत यांनी आगामी आंदोलनासाठी पक्षात पूर्ण एकजूट असल्याचा दावा केला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे नाव 'कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' आणि सिद्धिविनायक स्टेशनचे नाव 'ICICI लोम्बार्ड सिद्धिविनायक स्टेशन' ठेवल्याबद्दल सरकारला धारेवर धरले. हा भाजपचा 'कॉर्पोरेट हिंदुत्व'चा नवा प्रकार असून, केवळ पैशासाठी देव आणि महापुरुषांची नावे विकायला काढल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षात मतभेद असल्याच्या चर्चांना बगल देत, या आंदोलनाला सर्वांचा पाठिंबा असल्याचं सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement

















