Comrade Govind Pansare Case : 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहिल्यानेच कॉम्रेड पानसरेंची हत्या
Comrade Govind Pansare Case : 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहिल्यानेच कॉम्रेड पानसरेंची हत्या
'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहिलं म्हणूनच कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांचा हायकोर्टात खळबळजनक दावा. 20 फेब्रुवारी 2015 रोजी पानसरे यांची कोल्हापूर इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सीआयडी योग्य तपास करत नाही म्हणून गेल्यावर्षी हा तपास एटीएसकडे सोपवण्यात आलाय. दहशतवाद विरोधी पथकाचा तपास जैसे थे सुरूच, चार आठवड्यांत पुढील अहवाल सादर करण्याचे निर्देश. खटला जलदगतीनं निकाली काढण्याकरता आरोपींची हायकोर्टात याचिका. मोठ्या प्रमाणात शत्रसाठा सापडूनही मुख्य मारेकरी अद्याप मोकाटच का?, कुटुंबियांकडून नवे पुरावे हायकोर्टात सादर.



















