CM Uddhav Thackeray : विरोधी पक्षात असताना आम्ही राजभवनावर रोज येत नव्हतो : मुख्यमंत्री ABP Majha
राजभवनच्या दरबार हॉलचं नूतनीकरण झाल्यावरचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. दरबार हॉलचं उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टोलेबाजी पाहायला मिळाली. राजभवनातील वारंवार होणाऱ्या भेटीवरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. विरोधी पक्षात असताना आम्ही राजभवनावर रोज येत नव्हतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. तसंच या नव्या वास्तूमध्ये आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षा करतो, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. राजकीय हवा कशीही असली तरी मलबार हिलची हवा चांगली असते असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.




















