CM-Governor Letter : राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं उत्तर
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रानेच उत्तर दिलं आहे. भगत सिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधीमंडळ अधिवेशनाचा कालावधी, विधानसभा अध्यक्ष निवड, ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलणे हे मुद्दे उपस्थित केले होते. त्या पत्राला आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. या पत्रात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तरं दिली आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद कायम पाहायला मिळत आहे. त्यातही राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील पत्र व्यवहार चर्चेचा विषय ठरला. आता पुन्हा दोघांमधील पत्राची पुन्हा चर्चा रंगली आहे.





















