CM vs Governor|माझ्या हिंदुत्वाला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही;मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना उत्तर
राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही प्रश्न विचारले आहेत. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली. "बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का?" असे सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत.
या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे. माझ्या हिंदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुंबईला पीओके म्हणणाऱ्याचं हसत-खेळत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल तुमच्या विनंतीचा सरकार जरुर विचार करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलं आहे.






















