Eknath Shinde Full Speech : हेलिकॉप्टर, लिंबू ते श्रीखंड; शिंदेंची तोफ ठाकरे-पवारांवर कडाडली Nagpur
CM Eknath Shinde at Maharashtra Winter Assembly Session: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath shinde) यांनी आज हिवाळी अधिवेशनात (Nagpur Hiwali Adhiveshan) अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आमदार हनुमान चालीसा वाचायला बसला तर त्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं.त्यांच्या खासदार पत्नीलाही जेलमध्ये टाकलं. पत्रकार अर्णब गोस्वामी आणि राहुल कुलकर्णी यांना जेलमध्ये टाकलं. गिरीश महाजन यांचा पूर्ण कार्यक्रम केला होता. आमच्या सरसकट चौकशा लावण्याचं त्यावेळी पाप केलं होतं. दादा (अजित पवारांना उद्देशून) तुम्ही आम्हाला सांगता की, सत्तेची मस्ती नसावी मग त्यावेळी कोणती मस्ती होती, असंही मुख्यमंत्री म्हणाले.




















