City 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : 22 June 2024 : ABP Majha
City 60 Superfast : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा : 22 June 2024 : ABP Majha
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मागण्यांसदर्भात अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठक, पत्राद्वारे सरकारचं हाके आणि वाघमारेंना आश्वासन.
महायुती सरकार ओबीसी आरक्षणाबद्दल संवेदनशील, २९ जूनला ओबीसी आरक्षणच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक होणार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपेंची माहिती.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून तपासणी, जरांगे पुन्हा सलाईनवर, काल बीड दौऱ्यावर गेल्यापासून अस्वस्थ वाटत असल्याची जरांगेंची माहिती.
ओबीसी समाजाचं आरक्षण न जाता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सरकारची भूमिका, हाकेंचं आंदोलन स्थगित झालंय, निश्चित सामंजस्यातून मार्ग निघेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास.
सरकार मराठ्यांना फसवतंय, सग्यासोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून मराठ्यांना न्याय मिळाला नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.
२९ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाने काढलेल्या आदेशानुसार पाणीपट्टीत वाढ, ही वाढ महाविकास आघाडीच्या काळातलीच, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य.