City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 03 जुलै 2024 : ABP Majha
एसटी बसच्या वाहकामध्ये आणि प्रवाशामध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल. नांदेडच्या कंधार आगारातल्या बसमधली घटना. तिकीट काढण्यावरून भांडण.
सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत कोसळली. शाळा बंद असताना मोठा अनर्थ टळला, मात्र धोकादायक इमारतीत शाळा सुरू असल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त.
नंदुरबारच्या शहाद्यात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी खाजगी सायबर कॅफे चालकांकडून लूट, सायबर कॅफे चालक फॉर्मसाठी १०० ते २०० रुपये जादाचे घेत असल्याचा नागरिकांचा आरोप.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर ही लाडकी बहीण योजनेची नाशिकमध्ये अंमलबजावणी नाही, सरकारच्या पोर्टलवर योजने संदर्भात पर्यायच नसल्याने अंमलबजावणी होत नसल्याची माहिती.
लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून पैशांची मागणी होऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. जे कुणी याचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा.
लोणावळा भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत दिली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा.
मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश. कमी दाबानं आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा मुद्दा आशिष शेलार यांनी मांडला मुद्दा.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठ्यात वाढ, गेल्या 24 तासांत झालेल्या पावसामुळे तलावातील पाणीसाठा दीड टक्क्यांनी वाढला, सातही तलाव मिळून 8.24 टक्के पाणीसाठा.