Amravati : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण? Ravi Rana यांनी बसवलेला पुतळा हटवणार?
अमरावतीमध्ये विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची जणू स्पर्धा सुरु झाली आहे. १२ जानेवारीला आमदार रवी राणा यांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. तर काल रातोरात शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. दरम्यान रवी राणा यांच्याकडून बसवण्यात आलेला पुतळा हटवण्यासाठी महापालिकेनं हालचाली सुरु केल्यात. काल रात्रीच पोलीस फौजफाट्यासह महापालिकेचं पथक राजापेठ उड्डाणपुलावर दाखल झालंय. तर आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा कौर यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. दुसरीकडे शिवसेनेनं दर्यापूरमध्ये बसवलेल्या पुतळ्याच्या ठिकाणीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसंच पोलिसांनी शिवसेना तालुकाप्रमुखासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
