एक्स्प्लोर
Chhatrapati Shivaji Maharaj forts UNESCOमहाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा,राज ठाकरेंकडून अभिनंदन
महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील अकरा किल्ले, तर तमिळनाडूतील एक जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. शिवरायांच्या बारा किल्ल्यांना UNESCO कडून जागतिक वारसा दर्जा मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी सरकारचं अभिनंदन केलं आहे. मात्र, त्याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाचा आणि खोचक सल्ला देखील दिला आहे. राज ठाकरेंनी म्हटलं आहे की, "युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला, म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. निकष नीट पाळले नाहीत, तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं." याची आतापर्यंत दोनच उदाहरणं आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये, तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत, ती तात्काळ पाडून टाकावीत. त्यात जात, धर्म पाहण्याची गरज नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















