Sambhajinagar Land Scam : रुग्णालयासाठी राखीव भुखंड उद्योगासाठी वापरला, दोन मंत्र्यांचं सरकारला पत्र
Sambhajinagar Land Scam : रुग्णालयासाठी राखीव भुखंड उद्योगासाठी वापरला, दोन मंत्र्यांचं सरकारला पत्र
त्याचं झालं असं संभाजीनगरच्या वाळूज भागातील आठ हजार चौरस फुटांचा एक खुला प्लॉट आहे. ही जागा इंडस्ट्रियलमध्ये रुपांतरीत करण्यासाठी संभाजीनगरच्या दोन मंत्र्यांनी उद्योगमंत्रांना पत्र लिहिलं.त्यातील एक होते स्वतः पालकमंत्री संदिपान भुमरे आणि दुसरे होते केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड. रुग्णालयाच्या उभारणीसाठी राखीव असलेला हा भूखंड औद्योगिक वापरासाठी करावा असं त्यात लिहिलं आहे. त्यानंतर संबंधित यंत्रणेने ८ हजार चौरस फुटांपैकी पाच हजार चौरस फुटांचा भूखंड इंडस्ट्रियल केला. त्यासाठी आर के रॉयल कंट्रोल एल एल पी या कंपनीची मागणी आली आणि तिथे आता मात्र वेअर हाऊस उभारणार असल्याचं या पत्रात लिहिलं गेलं. मात्र आर के रॉयल कंट्रोल एल एल पी कंपनीचा जो पत्ता होता त्यावर कॉन्टॅक्ट म्हणून जो ईमेल दिला होता तो होता स्वतः मंत्री संदिपान भुमरे यांचा. त्या भागातील नागरिकांनी याच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका केली कोर्टाने देखील संदिपान भुमरे यांनाच हा प्लॉट हवा असल्याची टिपणीही केली आणि या प्रकरणाला स्थगिती देण्याचे आदेश दिले.