Chhagan Bhujbal to Meets Sharad Pawar : छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर
राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला सिल्वरओक या निवासस्थानी दाखल भेटीचं कारण अस्पष्ट
राठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बैठकीच्या मुद्द्यावरुन शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे आज(सोमवारी) सकाळी अचानक शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे दाखल झाले. छगन भुजबळ यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. छगन भुजबळ अचानक शरद पवार(Sharad Pawar) यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे. या भेटीच्या चर्चेदरम्यान अजितदादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी एबीरी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.



















